⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची सप्टेंबरमध्ये जळगावात जाहीर सभा

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची सप्टेंबरमध्ये जळगावात जाहीर सभा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज| २० ऑगस्ट २०२३।राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे येत्या ४ सप्टेंबरला जळगावात येत आहेत. त्या पाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही येत्या १० सप्टेंबरला जळगावात येत आहेत.

त्यामुळे पुढील महिन्यात जिल्ह्यात राजकिय धुमाळी असणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींनंतर श्री. पवार प्रथमच जळगावात येत आहेत. त्यांची सागर पार्क मैदानावर जाहीर सभा होणार असल्याचे आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले. त्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.

तर, श्री. ठाकरे यांच्या हस्ते १० सप्टेंबरला पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी दिली. या संदर्भात त्यांनी नुकतीच मुंबई येथे श्री. ठाकरे यांची भेट घेतली.

त्यांच्या समवेत महानगर प्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील उपस्थित होते. जळगावमध्ये ठाकरे यांचीही जाहीर सभा होणार असून, त्यांनी जिल्ह्यातील राजकीय परिस्थतीचा आढावाही घेतल्याचे भंगाळे यांनी सांगितले.

“पिंप्राळा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याच्या जागेचे भूमीपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी अनावरणालाही आपण येवू असा शब्द दिला होता. त्यानुसार त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे.” -कुलभूषण पाटील, उपमहापौर

author avatar
टीम जळगाव लाईव्ह