जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२२ । शहरातील रुशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचालित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्राला रोटरी क्लब स्टारतर्फे शुक्रवारी ३ शिलाई मशीन भेट देण्यात आले.
उडान फाऊंडेशनच्या कार्यालयात पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर रोटरी क्लब स्टार्सचे अध्यक्ष नीरज अग्रवाल, सचिव विपुल पटेल, उडानच्या रचना मंत्री, आयुषी बाफना आदी उपस्थित होते. रोटरी स्टार्सतर्फे दिव्यांग महिलांच्या सक्षमीकरणासाठी ३ शिलाई मशीन भेट देण्यात आले. प्रसंगी आणखी ७ मशीन भेट देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
उपक्रमाचे प्रास्ताविक रोटरीचे माजी अध्यक्ष सागर मुंदडा यांनी केले तर आभार माजी अध्यक्ष धनराज कासट यांनी मानले. उपक्रमासाठी उडानच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, चेतन वाणी, दीपा कक्कड यांनी परिश्रम घेतले.