जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ । धरणगाव तालुक्यातील सतखेडासह १२ गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने अंजनी प्रकल्पातून या खेड्यांना पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडावे अशी मागणी माजी जि.प सदस्य गोपाळ चौधरी यांनी के ली होती. तसेच पालकमंत्र्यांकडे देखील याबाबत त्यांनी पाठपुरावा केला होता.याची दखल घेत आज झालेल्या बैठकीत ना.गुलाबराव पाटील यांच्या आदेशान्वये अंजनीतून पिण्याच्या पाण्याचे ६५ दलघफुचे आवर्तन आज दि.२१ रोजी अंजनीनदीतून सोडले जाणार आहे.गोपाळ चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
धरणगाव तालुक्यातील कल्याणे खु.,वाघळूद,चावलखेडा,पिंपळेसीम,भोद बु.,हनुमंतखेडा,पिंप्री खु,कल्याणे होळ ,कल्याणे बु,भोद खु.,हिंगोणे खु व सतखेडा या गावांमध्ये उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासत आहे. पाणी टंचाई दुर व्हावी यासाठी माजी जि.प सदस्य गोपाळ चौधरी यांनी अंजनी प्रकल्पातून या गावांसाठी आवर्तन सोडण्याची मागणी ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. जिल्हा परिषदेच्या ग्रामिण पाणीपुरवठा विभागाने देखील गिरणा पाटबंधारे विभागाकडे अहवाल सादर केला होता.दि.६ मेे रोजी खरीप आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी अंजनीतून बिगर सिंचन पाण्याचे आवर्तन सोडण्याची सुचना केली होती.
दरम्यान आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चित समिती यांच्याकडून संबधीत १२ गावांसाठी १.८१३ दलघमी पाणी आरक्षण करण्यास मान्यता दिली आहे.गेल्या काही दिवसापासून गोपाळ चौधरी यांनी याबाबत पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्याने याची दखल ना.गुलाबराव पाटील यांनी घेतलीे आहे.त्यामुळे १२ ते १३ गावांमध्ये आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचे त्यांनी सांगितले.