जळगाव लाईव्ह न्युज । ८ एप्रिल २०२२ । गेल्या आठवड्याभरापासून जळगाव शहरात उन्हाचा तडाखा वाढला होता. . येत्या आठवड्यात पुन्हा उन्हाचा तडाका वाढेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे नागरिकांनी बदलत्या वातावरणात स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिण्याची गरज असल्याचे डॉ संगीता गावित यांनी सांगितले.
यावेळी त्या म्हणाल्या की गेल्या कित्येक दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. मात्र नागरिकांनी उन्हापासून स्वतःचे संरक्षण करणे अतिशय गरजेचे आहे. उन्हापासून निरोगी राहायचे असेल तर नागरिकांनी भरपूर पाणी पिण्याचे अतिशय गरजेचे आहे कारण, भरपूर पाणी प्यायलास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. याचबरोबर पाचनशक्ती ही मजबूत होते. उन्हाळ्यात होणारे बहुतांश आजार हे पचनाशीच निगडित असतात. हे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे.
सर्वसामान्य नागरिक उन्हाची पर्वा न करत आपले काम पूर्ण करण्यासाठी उन्हातानात हिंडत असतात. मात्र यावेळी नागरिक शरीराला हवे इतके पाणी पीत नाहीत. अशा वेळेस नागरिकांनी जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे कारण पाणी न पिण्यास त्याचा थेट परिणाम हा शरीरावर होतो. शरीरातले पाणी कमी झाल्यास सुरुवातीला ओठ कोरडे पडतात. घाम यायला सुरुवात होते. पोटदुखी डोकेदुखी यासारखे आजारही होतात. अखेर कित्येकदा शौचास त्रास होतो किंवा शौचातून रक्तही निघते. अशा वेळेस नागरिकांनी पाणी पिणे अतिशय गरजेचे आहे असे यावेळी डॉक्टर यांनी सांगितले.
या गोष्टी खा व या गोष्टी खाऊ नये
ऊन जास्तीत जास्त तापायला लागले की नागरिकांनी आहारात बदल करणे अतिशय गरजेचे असते. नागरिकांनी आहारात फळ खाल्ली पाहिजेत. विशेष करून ज्या फळांमध्ये पाण्याची मात्रा जास्त असते ती फळ खाणे अतिशय गरजेचे आहे. टरबूज खरबूज द्राक्ष डाळिंब अशा प्रकारची फळ नागरिकांनी खाणे अतिशय गरजेचे आहे. याचबरोबर कोकम सरबत लिंबू सरबत यासारखे पेय देखील नागरिकांनी पिणे अतिशय गरजेचे आहे. नागरिकांनी घरात पाणी उकळूनच पिणे गरजेचे आहे. असे यावेळी डॉ. गावित यांनी सांगितले. याचबरोबर त्या म्हणाल्या की ऊन तापलेले असताना नागरिकांनी कटाक्षपणे बाहेरचे उघड्यावरचे खाणे टाळले पाहिजे.