---Advertisement---
गुन्हे धरणगाव

पिंप्री खुर्द येथून सात वर्षीय चिमुकलीचे अपहरण

---Advertisement---

Dharangaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२२ । धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथून ७ वर्षीय चिमुकलीचे अपहरण केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीसांत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 08 02T122813.843 jpg webp

धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे सात वर्षाची मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवार ७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सात वर्षाच्या चिमुकली खेळत असतांना अपहरण केल्याचे  समोर आले. मुलीच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला परंतू ती कुठेही मिळून आली नाही. अखेर मुलीच्या वडीलांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उमेश भालेराव करीत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---