नागपूर विभागातील ब्लॉकमुळे उद्या भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ रेल्वे गाड्या रद्द, महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्येही बदल
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२४ । भुसावळ मार्गे तुम्हीही नागपूरला रेल्वेनं जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे नागपूर विभागामध्ये सिंदी स्थानक आणि यार्डात रिमॉडेलिंग आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगची कामे केली जाणार असल्यामुळे उद्या बुधवारी (दि.१८) ब्लॉक घेतला आहे. दुसरीकडे नागपूर वर्धा विभागात तिसरी आणि चौथी मार्ग, लाँग हॉल, लूप लाइनसाठी पायाभूत कामे सुरू आहेत. त्यामुळे प्रशासनाने ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकमुळे बुधवारी नागपूरकडे जाणाऱ्या ७ मेमू गाड्या रद्द केल्या आहेत. तर दोन गाड्या शॉर्टटर्मिनेट केल्या आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होईल.
बुधवारी नागपुरातील ब्लॉकमुळे अमरावती – वर्धा मेमू, वर्धा- अमरावती मेमू, भुसावळ – वर्धा एक्स्प्रेस, वर्धा भुसावळ एक्स्प्रेस, अमरावती अजनी एक्स्प्रेस, अजनी अमरावती एक्स्प्रेस, अमरावती जबलपूर एक्स्प्रेस या गाड्या रद्द असतील, अशी माहिती प्रशासनाने दिली.
महाराष्ट्र एक्स्प्रेस शॉर्टटर्मिनेट :
११०३९ कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस १८ रोजी वर्धा स्टेशन येथे शॉर्ट टर्मिनेट असेल. ही गाडी वर्धा ते गोंदियादरम्यान रद्द राहील. ११०४० गोंदिया – कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस १८ रोजी वर्धा स्टेशन येथून नियोजित वेळेत सुटेल.न येथे शॉर्ट टर्मिनेट असेल. ही गाडी वर्धा ते गोंदियादरम्यान रद्द राहील. ११०४० महाराष्ट्र एक्स्प्रेस १८ रोजी वर्धा स्टेशन येथून नियोजित वेळेत सुटेल.