डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जटील पध्दतीच्या हृदय शस्त्रक्रियांसाठी डॉ. अदनान अली यांची सेवा उपलब्ध

जून 19, 2026 6:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात अत्यंत जटील पध्दतीच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अदनान अली यांची २४ तास सेवा उपलब्ध झाली आहे.

Dr. Adnan Ali

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाच्या हृदयालय या विभागात हृदयविकाराशी संबंधित सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. यासोबतच आता जटील पध्दतीच्या हृदयाच्या शस्त्रक्रियांसाठी हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अदनान अली यांची सेवा रूग्णांसाठी उपलब्ध झाली आहे. डॉ. अदनान यांनी जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय व केईएम रूग्णालय येथून एमबीबीएस आणि एमडीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नायर हॉस्पीटल येथून डीएम कार्डीओलॉजी केले आहे. नायर हॉस्पीटल येथे सहायक प्राध्यापक, वरीष्ठ निवासी हृदयरोग तज्ज्ञ, कांदिवली येथे शताब्दी रूग्णालयात वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी, सायन रूग्णालय येथे सहायक प्राध्यापक म्हणून कार्य केले आहे.

आत्तापर्यंत त्यांनी ७५० हून अधिक रूग्णांवर एन्जीओप्लास्टीच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. तसेच तीन हजाराहून अधिक एन्जीओग्राफी, ७० हून अधिक पेसमेकर शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. आता डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात डॉ. अदनान यांची सेवा हृदयविकार रूग्णांसाठी २४ तास उपलब्ध झाली आहे. तरी रूग्णांनी सकाळी १० ते दुपारी ५ यावेळेत हृदयविकाराशी संबंधित तपासणी करून घ्यावी असे आवाहन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now