⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

रिल्स बनविण्याच्या नादात तरुण दरीत कोसळून गंभीर जखमी!

जळगाव लाईव्ह न्यूज| २४ जुलै २०२३| रिल्स बनवण्याच्या नादात एक तरुण दरीत कोसळून जबर जखमी झाला आहे. जामनेर जवळ दुपारी बारा वाजता ही घटना घडली आहे. सध्या सोशल मीडियाच्या नादात तरुणाई हरवलेली दिसून येते. इंस्टाग्रामवर रिल्सचा भन्नाट ट्रेंड सुरू आहे.

जामनेर शहरात तसेच तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. भुसावळ येथील काही तरुण पावसाचा आनंद घेण्याकरता जामनेर मार्गे बोदवड रोडवरील जंगलात जात होते. तीन ते चार दुचाकींवर प्रत्येकी तीन तीन तरुण प्रवास करत होते यातील दोन तरुण रिल्स बनवत होते. भवानी घाटात पोचल्याचे त्यांच्या लक्षात आले तेव्हा घाटातच मित्राला ओव्हरटेक करताना त्यांची दुचाकी घसरली.

यात दुचाकीच्या मागे बसलेला रिल्स बनवणारा तरुण आवेश शेख घाटाच्या खोल दरीत जाऊन पडला. त्याचा पूर्ण पाय फ्रॅक्चर होऊन डोक्याला मार लागलेला आहे सोबत असलेल्या मित्रांनी त्याला बाहेर काढले व रिक्षातून भुसावळकडे रवाना केले.

“मोबाईलच्या अतिवापरामुळे रात्री उशिरापर्यंत रिल्स पाहण्याचे मानसिक परिणामही समोर आले आहेत. मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढू लागला आहे. उदासीनता, मानसिक थकव्यासोबत ताणतणावाचे प्रमाणही वाढत आहे.” असे डॉक्टर विनय सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, जामनेर यांनी वक्तव्य दिले.