---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

तेव्हा बाळासाहेबांनी अमित शाहांसाठी फोन फिरवला अन्…संजय राऊतांच्या पुस्तकातून खळबळजनक गौप्यस्फोट

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईडी कोठडी आणि आर्थर रोड कारागृहात असताना ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तक लिहिले असून या आपल्या पुस्तकातून देशाच्या राजकारणात खळबळ माजवणारा गौप्यस्फोट केला आहे.

modi shah

२००२ च्या गुजरात दंगलीप्रकरणी तक्लानी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आणि खूनप्रकरणी अमित शाह यांच्यावर युपीए सरकारच्या काळात गंभीर आरोप होते. त्यांना अटक होणार होती. पण त्या काळात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी दोघांना संकटातून बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असा दावा राऊतांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

---Advertisement---

गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत संजय राऊतांनी आपल्या पुस्तकात मोठा खुलासा केला आहे. गुजरातमधून तडीपार झालेल्या शाहांनी बाळासाहेब ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दोनदा प्रयत्न केले. दुसऱ्या प्रयत्नात त्यांना बाळासाहेबांशी बोलता आले. शाहांनी हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा भोगत असल्याचे सांगितले. बाळासाहेबांनी एका महत्त्वाच्या व्यक्तीशी फोनवरून संवाद साधत शाहांच्या अडचणी दूर केल्या. “तुम्ही कोणत्याही पदावर असाल, पण हिंदू असल्याचे विसरू नका,” असे बाळासाहेबांचे शेवटचे वाक्य होते, असे राऊत लिहितात.

राऊतांच्या मते, गुजरात दंगलीप्रकरणी मोदींना अटक होण्याची शक्यता होती. मात्र, शरद पवारांनी कॅबिनेट बैठकीत लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला अटक करणे अयोग्य असल्याचे मत मांडले. याला काही सहकाऱ्यांनी मूकसंमती दिल्याने मोदींची अटक टळली. त्याचप्रमाणे, अमित शाह यांच्यावर खूनप्रकरणी सीबीआय चौकशी सुरू असताना बाळासाहेब ठाकरेंना विनंती केली. बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्र कॅडरच्या एका सीबीआय अधिकाऱ्याशी संपर्क साधून शाहांना मदत केल्याचा दावा राऊतांनी केला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment