---Advertisement---
गुन्हे एरंडोल

खळबळजनक : मोरीत लघुशंका केल्याने झाला वाद, मोठ्या भावाने लहान्याला संपविले, मृतदेह पोत्यात टाकून गिरणेत फेकला!

---Advertisement---

Erandol News | जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यातील खून प्रकरण काही थांबायचे नाव घेत नाही. तालुक्यातील भातखंडे गावाजवळ गिरणा नदीपात्रात आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. घरातील मोरीत लघुशंका केल्याच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाला संपविल्याचे समोर आले आहे. सत्यवान धोंडू महाजन (वय-५५) रा.उत्राण ता.एरंडोल असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मारेकरी मोठा भाऊ भगवान महाजन याला जेरबंद केले असून कासोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

murder 1 1

तालुक्यातील भातखंडेच्याजवळ गिरणा नदीपात्रात एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. हा व्यक्ती तालुक्यातील उत्राण येथील सत्यवान धोंडू महाजन यांचा असल्याची ओळख पटली. त्यांचा मृत्यू गिरणेच्या पाण्यात वाहून गेल्याने झाला नव्हता, तर त्याचा खून झाल्याची धक्कादायक माहिती तपासात निष्पन्न झाली. या प्रकरणी सत्यवान महाजन यांना त्यांचाच मोठा भाऊ भगवान धोंडू महाजन याने संपविल्याची माहिती मिळाली. यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

---Advertisement---

भगवान महाजन याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच त्याने पोलिसांना घटनाक्रम सांगितला. त्यानुसार भगवान महाजन (वय ६२) आणि सत्यवान महाजन (वय ५५) हे दोन्ही भाऊ एरंडोल तालुक्यातील उत्राण (गु.ह.) गावातील रहिवासी आहेत. दोन्ही एकाच घरात राहत असून त्यांच्यात अनेकदा कुरबुरी होत होत्या. दिनांक १२ सप्टेंबर रोजी सत्यवान महाजन यांनी घरातील मोरीत लघुशंका केल्यावरून वाद झाला. यातून संतापलेल्या भगवान याने डोक्यात मुसळी हाणल्याने सत्यवान महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. भगवानने मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवला. यानंतर रात्री उशीरा त्याने पोत्यातून मृतदेह नेउन तो गिरणा नदीच्या पात्रात फेकून दिला.

तर दुसरीकडे गिरणेत मृतदेह आढळून आल्यानंतर भगवान हा घरातून गायब झाला. त्याने शुक्रवारी उत्राणमधील एकाला फोन करून बोलावत याची माहिती दिली. त्या व्यक्तीने भगवान महाजन याला पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्याची सांगितले. मात्र त्याने तेथून पलायन केले. शेवटी उत्राण पोलीस पाटलांनी पोलिसांच्या मदतीने एरंडोल बस स्थानकावरून भगवान महाजन याला जेरबंद केले. या संदर्भात कासोदा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. जळगाव जिल्हा पोलिसांनी अवघ्या काहीतासात गुन्हा उघडकीस आणल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---