⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! आता बँक FD वर मिळणार ८.८ टक्के व्याज..

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२३ । ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे अर्थसंकल्प 2023 च्या सादरीकरणानंतर ज्येष्ठ नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा आणि फायदे दोन्ही मिळाले आहेत. सर्वसाधारण अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) अंतर्गत गुंतवणूक मर्यादा वाढवल्यानंतर, बँकांनी आता मोठ्या ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी FD वर व्याज वाढवले ​​आहे. याचा दुहेरी फायदा ज्येष्ठ नागरिकांना होत आहे.

बंधन बँक आणि जन स्मॉल फायनान्स बँक या बँकांनी मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. या बँका ज्येष्ठ नागरिक आणि इतरांना एफडीवर आकर्षक व्याजदर देत आहेत.

आता FD वर 8.80% पर्यंत व्याज
बंधन बँकेने सोमवारी मुदत ठेवींच्या व्याजदरात ५० bps ने वाढ केली आहे. बँकेने सांगितले की, सुधारित दर 2 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर लागू होतील. नवीन दर 6 फेब्रुवारी 2023 पासून लागू झाले आहेत. तथापि, हे नवीन दर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असतील. बंधन बँक आता ज्येष्ठ नागरिकांना 600 दिवसांच्या मुदतीच्या FD साठी 8.5% चा सर्वोच्च व्याज दर देत आहे, तर बिगर ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेचा व्याजदर 8% आहे.

जन स्मॉल फायनान्स बँकेने 1 फेब्रुवारी 2023 पासून नियमित मुदत ठेवींवर आणि 6 फेब्रुवारी 2023 पासून FD प्लस योजनेवर व्याजदर वाढवले ​​आहेत. त्याचवेळी, जनता बँक 1 फेब्रुवारी 2022 पासून ज्येष्ठ नागरिकांना आवर्ती ठेवींवर 8.8% पर्यंत व्याज देखील देत आहे.

जनता बँक आता ज्येष्ठ नागरिकांसाठी 2 वर्षे ते 3 वर्षांच्या FD वर 8.8% पर्यंत व्याज देत आहे, तर गैर-ज्येष्ठ नागरिकांसाठी दर 8.10% आहे. त्याच वेळी, ग्राहकांना 2-3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी FD Plus वर 8.25% व्याजाचा लाभ मिळू शकतो.

अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी दिला मोठा दिलासा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण बजेटमध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) मधील गुंतवणुकीची कमाल मर्यादा 15 लाख रुपयांवरून 30 लाख रुपये केली आहे. ही योजना सरकारद्वारे देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवली जाणारी बचत योजना आहे. ही योजना 2004 मध्ये सुरू झाली.

निवृत्त लोकांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा त्याचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील अनेक बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येते. केंद्र सरकारने 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील (SCSS) व्याजदरात 8 टक्के वाढ केली आहे.