सोमवार, डिसेंबर 4, 2023

मुलीला नांदवण्यास पाठवा नाहीतर लग्नात लागलेले तीन लाख रुपये आम्हाला परत द्या !

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२३ । जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिच्यावर मनाविरूध्द अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाळीसगाव तालुक्यात हि घटना घडली आहे. पतीसह सासरच्या मंडळींविरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तालुक्यातील सायगावच्या काकाजी राजेंद्र सोळसे याच्याशी मार्च 2023 मध्ये लग्न लावण्यात आले मात्र पीडीता ही अल्पवयीन असल्याचे माहित असतांना तिच्या मनाविरोधात अत्याचार करण्यात आल्यानंतर पीडीता ही माहेरी निघून आली.

त्यानंतर तिच्या पतीसह सासरचे मंडळी तिला घेण्यासाठी आले. त्यावेळी तिने जाण्यास नकार दिला परंतु मुलीला नांदवण्यास पाठवा नाहीतर लग्नात लागलेले तीन लाख रुपये आम्हाला परत द्या, अशी धमकी वजा दम देत मारहाण करण्यात आली. पीडीतेने मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.

त्यानुसार काकू मीरा दिलीप लोखंडे, काका दिलीप बाबुराव लोखंडे, मावसभाऊ रविंद्र दिलीप लोखंडे, मावस बहिण मनिषा ज्ञानेश्वर वाघ, मावस भाऊ धिरज दिलीप लोखंडे (सर्व रा.कळवण), मावशी कल्पना राजू वाघ (सटाणा), पती काकाजी राजेंद्र सोळसे, सासू लताबाई राजेंद्र सोळसे, सासरे राजेंद्र तुकाराम सोळसे, जेठ योगेश राजेंद्र सोळसे, जेठ ज्ञानेश्वर राजेंद्र सोळसे (सर्व रा. सायगाव, ता. चाळीसगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहे