जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२१ । शून्य ते सहा वर्ष वयोगटात मुलांचा बौद्धिक विकास जलद गतीने होत असतो. लहान मुलांच्या पालकांना ‘खेळांची जादू, मुलांचा विकास आणि संगोपन’ या विषयावर प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ.अविनाश भोसले व उम्मीद चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटर मुंबईच्या बालविकास रोग तज्ज्ञ डॉ.लिरा लोबो या मार्गदर्शन करणार आहेत. श्री चैतन्य हॉस्पिटल, जळगाव लाईव्ह आणि आमचं जळगावच्या माध्यमातून या ऑनलाईन चर्चासत्राचे दि.२० ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता आयोजन केले जाणार आहे.
लहान मुलांची वाढ होत असताना त्यांचा बौद्धिक विकास जलद गतीने होत असतो. नवनवीन गोष्टी आत्मसात करताना त्यांच्या भावना आणि स्वभाव देखील वारंवार बदलत असतो. शून्य ते सहा वर्ष वयोगटातील सर्व बालकांच्या पालकांसाठी श्री चैतन्य हॉस्पिटल, जळगाव लाईव्ह आणि आमचं जळगावतर्फे मोफत ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. ‘खेळांची जादू, मुलांचा विकास आणि संगोपन’ या विषयावर श्री चैतन्य हॉस्पिटलचे डॉ.अविनाश भोसले आणि उम्मीद चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटरच्या बालविकास रोग तज्ज्ञ डॉ.लीना बोरो या मार्गदर्शन करणार आहेत.
दि.२० ऑक्टोबर बुधवार रोजी दुपारी ४ ते ५ या वेळेत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून आपण जळगावव लाईव्ह, आमचं जळगावच्या फेसबुक पेजद्वारे याचा ऑनलाईन लाभ घेऊ शकतात. शून्य ते वर्ष वयोगटातील बालकांच्या पालकांनी आवर्जून हा कार्यक्रम पहावा असे आवाहन श्री चैतन्य हॉस्पिटल, जळगाव लाईव्ह आणि आमचं जळगावतर्फे करण्यात आले आहे.