जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२१ । दादावाडी परिसरात मागील 2 महिन्यांपासून फुटलेली पाईप लाईन दुरुस्त करून खड्डा आहे त्याच परिस्थितीत न बुजवता सोडून देण्यात आला. त्यामुळे परिसरातील लोकांना खूप त्रास सहन करावा लागतोय. नागरिकांनी झालेल्या खड्डयांची दुरुस्ती साठी प्रभागातील नगरसेवकांना निवेदन देऊन देखील त्या खड्ड्याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही, आतापर्यंत खड्ड्यात जवळपास 15 ते 20 मोठ्या गाड्या फसल्याचे व 30 ते 40 नागरिक रात्रीच्या वेळी पडल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.
आज शेवटी अॅड. कुणाल पवार यांच्या संकल्पनेतून त्या खड्याला आमदार, खासदार, नगरसेवक यांची नावे देऊन सेल्फी पॉईंट सुरू करण्यात आला. त्या खड्यात कुंदन सूर्यवंशी, राहुल पाटील, सचिन नांनवरे, नितीन जाधव, सागर पाटील, पवन पवार व जेष्ठ मंडळींनी सेल्फी काढण्याचा आनंद लुटला.
कुंदन सूर्यवंशी यांनी परिसरातील नागरिकांना फोटो काढण्याचे आवाहन केले आहे व फोटो स्पर्धा देखील आयोजित केली आहे आणि ज्याचा खड्डया सोबत उत्कृष्ट फोटो येईल त्यांना योग्य ते बक्षीस देखील देण्यात येणार आहे