वरुणराज नन्नवरेची आयसीएमआर प्रोजेक्टसाठी निवड!
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२३ । भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद ही भारतामध्ये वैद्यकशास्त्रातील संशोधन आणि सहयोगाला उत्तेजन देणारी भारत सरकारची संस्था आहे. या अंतर्गत दरवर्षी १५०० वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना शॉर्ट टर्म स्टुडंटशिप कार्यक्रम अंतर्गत संशोधन करण्याची संधी मिळते. या वर्षी ती संधी डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असणार्या व महाविद्यालयाचा जनरल सेक्रेटरी असलेला वरुणराज नन्नवरे याला मिळाली आहे.
यासाठी वरुणराजला फारमॅकोलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ राहुल भावसार यांचे मार्गदर्शन लाभले. सुमारे २०,००० प्रपोजल मधून केवळ १००० एमबीबीएस विद्यार्थ्यांचे प्रपोजल निवडले जातात. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, सचिव डॉ वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, हृदयरोगतज्ञ डॉ वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ एन एस आर्वीकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांच्यासह सर्व प्राध्यापकांकडून वरुणराजचे अभिनंदन करण्यात आले.