जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने इंजिनिअरिंग सिव्हिल मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर केला असून यात तेजस्वी रेवागड हिची दिव्यांग संवर्गातून वॉटर कन्झर्व्हेशन ऑफिसरपदी निवड झाली.
तर वैभव ढाकणे यांची असिस्टंट इंजिनिअर सिव्हिल गट ‘ब’ पदी वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये तर प्रशांत तरंगे यांची असिस्टंट इंजिनिअर गट ‘ब’ पदी पब्लिक वर्क डिपार्टमेंटला निवड करण्यात आली आहे. तिघा यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रा. गोपाल दर्जी, संचालिका ज्योती दर्जी व शिक्षकांनी गौरव केला.