शालेय राज्य टेबल टेनिस स्पर्धेसाठी स्वरदा साने व मन्मयी थत्ते यांची निवड
जळगाव लाईव्ह न्यूज । नाशिक येथे झालेल्या शालेय विभागीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून जळगांवच्या स्वरदा स्वानंद साने व मन्मयी मिलिंद थत्ते ह्या दोन्ही खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , नाशिक आणि नाशिक जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या स्पर्धेत जळगावच्या स्वरदा साने हीची 17 वर्षा खालील मुलींच्या गटात तर तसेच मन्मयी थत्ते हीची 14 वर्षा खालील मुलींच्या गटात निवड झाली.
शालेय राज्यस्तरीय स्पर्धा दिनांक २४ ते २६ सप्टेंबर या दरम्यान परभणी येथे होणार आहे. स्वरदा हीची सलग दुसऱ्यांदा राज्यस्तरीय स्पर्धा साठी निवड झाली आहे . गेल्यावर्षी तिने राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतांना तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक जिकले होते. या दोन्ही मुली प्रशिक्षक आकाश कासार याच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा क्रीडा संकुल येथे नियमित सराव करतात.