---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगावच्या खेळाडूची १६ वर्षा खालील महाराष्ट्र संघात निवड

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२२ । भारतीय क्रिकेट मंडळातर्फे आयोजित १६ वर्षा खालील विजय मर्चट व अंतर राज्य क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ पुणे येथे जाहीर करण्यात आला. यात जळगाव जिल्हा क्रिकेट असोसीएशनचा खेळाडु डावखुरा फिरकी गोलंदाज शतायू कुलकर्णी याची निवड करण्यात आली आहे.

shatayu jpg webp webp

औरंगाबाद येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसीएशनतर्फे घेण्यात आलेल्या १६ वर्षाखालील आमंत्रितांच्या साखळी स्पर्धेत त्याने ५ सामन्यात २३ बळी मिळावले, त्यानंतर पुणे येथे सूपर लीग मध्ये सेक्रेटेरी इलेवन संघाकडुन खेळताना ३ सामन्यात १८ गडी बाद करून लक्षणीय कामगिरी केली. तसेच सराव शिबिरातील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. शतायु कुलकर्णीच्या या निवडीबद्दल जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, एस. टी. खैरनार, सचिव अरविंद देशपांडे, सहसचिव अविनाश लाठी व जिल्हा क्रिकेट संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---