⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | खुशखबर! सिकंदराबाद ते भावनगर एक्स्प्रेस भुसावळमार्गे धावणार; ‘या’ स्थानकांवर असेल थांबा?

खुशखबर! सिकंदराबाद ते भावनगर एक्स्प्रेस भुसावळमार्गे धावणार; ‘या’ स्थानकांवर असेल थांबा?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२४ । रेल्वेनं प्रवास करणाऱ्या भुसावळातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमीचा आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सिकंदराबाद ते भावनगर टर्मिनस दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी भुसावळमार्गे धावणार असून त्याच्या आठ फेऱ्या होणार आहेत.

विशेष गाडी क्रमांक ०७०६९ सिकंदराबाद ते भावनगर टर्मिनस सिकंदराबाद येथून १९ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत दर शुक्रवारी रात्री ८ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ५.५५ वाजता भावनगर टर्मिनस येथे पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक ०७०६२ भावनगर टर्मिनस येथून २१ जुलै ते १९ ऑगस्टपर्यंत दर रविवारी सकाळी १०.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३.४५ वाजता सिकंदराबाद येथे पोहोचेल. या गाडीच्या चार फेऱ्या होणार आहेत.

या स्थानकांवर असेल थांबा
या विशेष गाडीला मेडचल, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, मुदखेड, नदिह, पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशिम, अकोला, भुसावळ, नंदूरबार, सुरत, वरोदरा, अहमदाबाद, विरंगम, सुखनगर, बोटाड, ढोला, सोनगढ़, सिहोर स्थानकावर थांबा आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.