⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

लॉकडाऊनमध्ये प्रकल्प कार्यालयाचा आधार अनुसूचित जमातीच्या कुटूंबांना मिळाले रेशन कार्ड

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२२ । एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत येणाय्रा जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या यावल, चोपडा ,रावेर तालुक्यांमधील दुर्गम ,अतिदुर्गम क्षेत्रातील आदिवासी बहुल भागातील आदिवासी जमातीच्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यशासनाच्या वतीने यावल प्रकल्पाद्वारे त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध योजना दरवर्षी राबविल्या जातात.

आदिवासी जमातीच्या लाभार्थ्यांना रेशन कार्ड ची नेहमी आवश्यकता असते हीच आवश्यकता ओळखुन श्रीमती. विनिता सोनवणे (प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल जि.जळगाव ) यांनी लॉकडाऊन कालावधीत खावटी अनुदान योजनेसाठी जळगाव जिल्ह्यातील पाडे ,वस्त्या ,1153 ग्रामपंचायती 01 मऩ.पा क्षेत्र आणि 17 नगरपरिषद क्षेत्रात सर्व्हे राबविला. शासकिय अधिकारी ,कर्मचारी मिळुण एकुण 453 लोकांनी केलेल्या सर्वेक्षणातील मिळालेल्या माहिती आधारे असे निर्दशनास आले की बहुसंख्य आदिवासी कुंटूबांकडे रेशन कार्ड तसेच जातिचे दाखले नसल्याचे.

प्रकल्पाधिकारी यांच्या पुढाकाराने तसेच लॉकडाऊन असल्यामुळे प्रकल्प कार्यालयामार्फत लोकसमन्वय प्रतिष्ठाण यांना न्युक्लिअस बजेट योजनेमध्ये नाममात्र दरात अनुसूचित जमातीच्या कुटूंबाचे रेशन कार्ड काढ़णे ही योजना देण्यात आली जेणे करुन आदिवासी कुटूंबांना रेशन कार्ड मिळ्ण्यात कुठ्ल्याही प्रकारे अड्थळे येऊ नये. सदर संस्थेमार्फत आजपावतो जिल्ह्यातील 6378 अनुसूचित जमातिच्या कुटूंबांना रेशन कार्ड वाटप करण्यात आले.

लोकसमन्वय प्रतिष्ठाण यांनी अनुसूचित जमातीच्या कूटूंबांच्या घरापर्यंत जाऊन त्यांचे कागदपत्रे जमा केली आणि तहसिल कार्यालयातुन रेशन कार्ड वितरणाची योजना पुर्णत्वास आणली.त्यासाठी लागणारी सर्व रक्कम प्रकल्प कार्यालया मार्फत अदा केली.