जळगाव लाईव्ह न्यूज । जून महिना आला की महाराष्ट्रातील तमाम वारकरी विठ्ठल भक्तांना ओढ लागतो ती पंढरपूरच्या वारीची.. अशा पंढरपूरच्या आषाढी वारीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

त्यानुसार १८ जून २०२५ रोजी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान देहूतून होणार आहे. तर आळंदीतून १९ जून २०२५ रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होईल. दोन्ही संस्थानाकडून पालख्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेय.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा प्रवास
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी १९ जून रोजी आळंदी येथील दर्शन मंडप इमारतीत पहिला मुक्काम करेल. २० जून रोजी पालखी पुण्यातील भवानीपेठ येथे पोहोचेल. तर २१ जून रोजी पुण्यातच मुक्कामी असेल. २२ जून रोजी पुण्याहून सासवडला प्रवास करताना शिंदे छत्री येथे आरतीसाठी विसावा आणि हडपसर येथे दुपारची विश्रांती होईल. २३ जून रोजी सासवड येथे मुक्काम असेल. २४ जून जेजुरी, २५ जून वाल्हे, २६ जून रोजी लोणंद, २७ जून तरडगाव, २८ जून फलटण आणि २९ जून बरड येथे पालखी थांबेल. ३० जून नातेपुते, १ जुलै माळशिरस, २ जुलै वेळापूर, 3 जुलै भंडीशेगाव आणि 4 जुलै वाखरी येथे मुक्काम होईल.
संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रवास
संत तुकाराम महाराजांची पालखी १८ जून रोजी श्रीक्षेत्र देहू येथून पंढरपूरकडे प्रस्तान करेल. आकुर्डी येथे पहिला मुक्काम असेल. २० तारखेला आकुर्डीमधून निघेल अन् नानापेठ पुणे येथे मुक्कामी असेल. २१ जून रोजी तुकाराम महाराज यांची पालखी निवडुंगा विठ्टळ मंदिरात दिवसभरेल. २२ तारखेला लोणीकारभोर, २३ तारखेला यवत, २४ तारखेला वरवंड, २५ तारखेला उडंबडी गवळ्याची, २६ तारखेला बारमती,२७ जून सणसर, २८ जून निमगाव केतकी, २९ जून इंदापूर,३० जून सराटी,१ जुलै अकलूज, २ जुलै बोरगाव श्रीपूर, ३ जुलै पिराची कुरोली, ४ जुलै वखारी (पंढरपूर) येथे मुक्काम असेल.