जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील करगाव येथील जगनभाऊ राठोड प्राथमिक आश्रम शाळा व लोकनेते काकासो जी.जी.चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संत श्रेष्ठ सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी चाळीसगाव ग्रामीण चे सहायक पोलीस निरिक्षक रमेश चव्हाण होते. तर प्रमुख अतिथी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धुळे रोड चाळीसगाव येथे कार्यरत वरिष्ठ महाविद्यालय व्याख्याते प्रा.डॉ.विनोद राठोड, त्यांच्या समवेत प्रा.कमलेश चव्हाण, मुख्याध्यापक डी.व्ही.पाटील, मुख्याध्यापक विजय बोरसे, पर्यवेक्षक कवी मनोहर आंधळे, आर.एस.पी.कमांडंट सुकदेव राठोड, सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धेचे प्रायोजक शिक्षक नरेंद्र नाईक, सेवालाल महाराज वेशभुषा साकारलेला विद्यार्थी भुपेश राठोड आणि करगाव (ईच्छापूर) ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रास्ताविक तथा अतिथींचा परिचय पर्यवेक्षक मनोहर आंधळे यांनी तर सूत्रसंचालन जयंती नियोजन समिती प्रमुख सुकदेव राठोड यांनी व कला शिक्षक डी.यू.चव्हाण यांनी आभार व्यक्त केले. तसेच संत सेवालाल महाराज वेशभुषा परिधान केलेला विद्यार्थी भूपेष राठोड यांस अश्वारूढ करुन आश्रम शाळेच्या प्रांगणापासून ते करगाव तांडा नं १, २ व ३ पर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी फेटे बांधून सहभागी झाले होते. विशेष परिश्रम शिक्षक पी.एस.पाटील यांनी घेतले.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..