---Advertisement---
मुक्ताईनगर

पालख्यांच्या प्रस्थानासाठी शिवशाही बस सज्ज; सोमवारी संत मुक्ताई पालखी जाणार पंढरीला

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२१ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत उद्या सोमवार, दि.१९ जुलै रोजी राज्यातील १० मानाच्या पालख्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रस्थान करणार आहेत. वारकऱ्यांचा पालखी प्रस्थान सोहळा नेत्रदीपक व्हावा यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यातील शिवशाही बस सज्ज झाल्या आहेत.  

sant muktai palkhi jpg webp

यात मुक्ताबाई पालखीचा समावेश असून १४ जून रोजी संत मुक्ताबाई पालखी सोहळा जुने मंदिर कोथळी येथून प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्थान होईल. पालखी नवीन मंदिरात मुक्कामाला होती‌. महिनाभर तेथेच नित्योपचार पूजा, कीर्तन व भजन पार पडले. सोमवारी आषाढ शुद्ध दशमी रोजी पहाटे ४ वा. शासनाच्या दिशानिर्देशानुसार राज्य सरकारने उपलब्ध केलेल्या शिवशाही बसने मानाचा संत मुक्ताबाई पालखी सोहळा कोथळी – मुक्ताईनगर पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. पोलीस बंदोबस्त, आरोग्य पथकासह रुग्णवाहिका सोबतीला असणार आहे.

---Advertisement---

४० वारकरी भाविकांना पालखीसोबत परवानगी असून त्यांचे लसीकरण व कोविड चाचणी निगेटिव्ह रिपोर्ट असणाऱ्या प्रतिनिधीची नावे घेण्यात आली आहेत. यामध्ये संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख, पुजारी, मानकरी, सेवाधारी, संत मुक्ताबाई फडावरील महाराज मंडळी, गायक, वादक, कीर्तनकार यांच्यासह सद्गुरू सखाराम महाराज सखारामपूर, मुकुंद महाराज एणगावकर, झेंडूजी महाराज बेळीकर, दिगंबर महाराज चिनावलकर, पंढरीनाथ महाराज मानकर, वक्ते निवृत्ती बाबा, दत्तूजी महाराज, मांगोजी महाराज कोकलवाडी, ह.भ.प. सारंगधर महाराज दिंडी आदी दिंडी परंपरेचे पाईक व गादीपती यांचा समावेश करण्यात आला आहे.

शासनाकडून नायब तहसीलदार प्रदीप झांबरे हे पालखीसोबत समन्वयक म्हणून राहणार आहेत. आरोग्य विभागाने डॉ. प्रताप राठोड, विजय पाटील, बिऱ्हाडे यांच्यासह आरोग्य पथकाने सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध केलेली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---