संत गाडगे बाबा बेघर निवारा केंद्राला मिळाला हक्काचा डॉक्टर
जळगांव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२२ । जळगाव शहरातील संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्र येथे जळगाव जिल्हा पोलीस दलातील मनोज सुरवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यवस्थापन मंडळासह संत गाडगे बाबा बेघर निवारा केंद्राच्या गोर गरीब व गरजू निराधारांनी डॉ. व औषधांची कमतरता आहे. अस मनोज सुरवाडे यांना सांगितल्याने यांनी या कमतरतेला प्रतिसाद देत डॉ. व औषधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. मित्रांच्या सहकार्याने जिल्हा पोलीस दलातील मनोज सुरवाडे यांनी डॉक्टर बोलवून सर्व निराधार लोकांचे आरोग्य तपासणी करत त्यांना औषधी डॉक्टर हे कायमस्वरूपी त्यांच्या सेवेसाठी उपलब्ध राहतील असे सांगितले.
संत गाडगे बाबा बेघर निवारा केंद्राच्या लोकांनी या केलेल्या कार्याबद्दल मनोज सुरवाडे, कुणाल मोरे यांचे व्यवस्थापन मंडळाच्या वतीने आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संपर्कप्रमुख कुणाल मोरे, पदधिकाऱ्यानी परिश्रम घेतले.
याप्रसंगी मनोज सुरवाडे, कुणाल मोरे यांच्यासह उद्योजक संदीप बोरोडे, डॉ. प्रसाद साटम, चेतन निंबोळकर, गणेश पाटील, व्यवस्थापक मनोज कुलकर्णी, काळजीवाहक दिपक चौधरी कर्मचारीसह आदीं उपस्थित होते.