---Advertisement---
गुन्हे अमळनेर

वाळू माफियांची गुंडगिरी! अंगावर टॅक्टर घालून तलाठ्याला मारण्याचा प्रयत्न

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात सुरु असलेली अवैध वाळू वाहतुकीचे प्रमाण काही केल्या कमी होत नसून अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन पकडल्याने तलाठ्याला मारहाण करून अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी चौघांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2 jpg webp webp

नेमका प्रकार काय?
अमळनेर तालुक्यातील पातोंडा, दहिवद परिसरात १९ नोव्हेंबरला सकाळी तलाठी संदीप शिंदे, योगेश पाटील, प्रकाश महाजन व मधुकर पाटील या चौघांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना नांद्री गावाकडून दहिवदकडे वाळूने भरलेले ट्रॅक्टर येत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी ट्रॅक्टर अडवून चालक योगेश संतोष पाटील याला पोलिस ठाण्यात नेण्यास सांगितले. मात्र, चालकाने नकार देत तलाठींना शिवीगाळ करत मारायला माणसं आणतो असे सांगून पळ काढला.

---Advertisement---

थोड्या वेळाने भूषण उर्फ सोनू देवरे व चालक योगेश पाटील हे दोघे मोटरसायकलने आले. सोबत दोनजण दुसऱ्या मोटरसायकलवर आले आणि तलाठींच्या पथकाला मारहाण सुरु केली. दरम्यान संदीप शिंदे यांना खाली पाडून भूषणने चालक योगेशला अंगावर ट्रॅक्टर घालून मारून टाका, योगेशने ट्रॅक्टर चालू केले. तेवढ्यात इतर तलाठींनी संदीप शिंदे यांना बाजूला ओढून वाचवले.

भूषण व इतरांनी तलाठी पथकाच्याच काठ्या हिसकावून पथकाला मारहाण सुरू केली. या मारहाणीत शिंदे यांच्या मांडीला व गुडघ्याला तसेच हाताच्या अंगठ्याला मार लागला तर प्रकाश महाजन यांना दोन्ही पायाला व डोक्याला मार लागला. तलाठी शिंदे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर (Police) पोलिसात भूषण देवरे, चालक योगेश संतोष पाटील व दोन अनोळखी अशा चौघांविरुधोत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---