⁠ 
गुरूवार, फेब्रुवारी 29, 2024

अरे वा! Samsung चा 12 हजाराचा फोन मिळतोय 7,000, ऑफर्स आणि फिचर्सबद्दल जाणून घ्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२३ । जर तुम्ही Samsung नवीन स्मार्ट फोने घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. कारण Samsung Galaxy M04 या फोनवर तुम्हाला बंपर डिस्काउंट मिळतंय. त्याचबरोबर फोनचे डिझाइन आणि फिचर्सही उत्तम आहे. तर जाणून घेऊया या फोनवर असलेल्या ऑफर्स आणि फिचर्सबद्दल.

Samsung Galaxy M04 (4GB+64GB) हा स्मार्टफोन तुम्ही अॅमेझॉनवरुनही ऑर्डर करु शकता. या फोनची किंमत 11,999 रुपये असून यामध्ये तुम्हाला 43 टक्के डिस्काउंट मिळत आहे. डिस्काउंट मिळाल्यानंतर 6,799 रुपयांत ऑर्डर करु शकता. त्याचबरोबर तुम्हाला या फोनवर अन्य ऑफर्सही मिळत आहेत. जुन्या स्मार्टफोनवर अॅमेझॉनवर एक्सचेंज ऑफरदेखील मिळत आहेत. एक्सचेंज ऑफरनंतर हा फोन तुम्हाला 6,450 रुपयांचे डिस्काउंटदेखील मिळत आहेत. मात्र, हे डिस्काउंट मिळवण्यासाठी तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असायला हवा.

डिस्काउंट किती मिळणार
सॅमसंगच्या या फोनवर तुम्हाला अनेक बँकेच्या ऑफर्सदेखील मिळत आहेत. क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यानंतर 750 रुपयांचे डिस्काउंट मिळत आहे. त्याचबरोबर 1 वर्षांची वॉरंटीदेखील फोनसोबत देण्यात येत आहे. स्पेसिफिकेशनसाठीही हा फोन बेस्ट आहे. कारण यात MediaTek Helio P35 Octa Core हा प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्यामुळं फोनचा स्पीड खूप चांगला आहे.

फोनची बॅटरी क्षमता
डुअल रियर कॅमेरा सेटअप या फोनमध्ये देण्यात आलेला आहे. तर. प्रायमरी कॅमेरा 13 MP असून 5 MP फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन तुमच्या बजेटमधला आहे. यात 6.5 इंचाचा LCD HD+ Display देण्यात आला आहे. 5000 mAh Battery असल्यामुळं चार्जिंगचे टेन्शनदेखील नाही. त्यामुळं एका चार्जमध्येही फोनची बॅटरी कित्येक तास टिकू शकते.