⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 17, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | श्री छत्रपती राजे संभाजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

श्री छत्रपती राजे संभाजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ सप्टेंबर २०२२ । जळगाव येथील मंगलमूर्ती बहुद्देशीय शिक्षण मंडळ संचालित श्री छत्रपती राजे संभाजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. आर. व्ही. पाटील सर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ महाजन सर, प्रा. माधुरी पाटील, प्रा. किशोर गुंजाळ, प्रा. डॉ. जगदीश निमकर, योगेश खैरनार गोरख राठोड हे उपस्थित होते. या वेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

तसेच विद्यार्थी शिक्षिका भारती आमोदकर व विद्यार्थी शिक्षक महेश जोशी यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाबद्दल तसेच शिक्षणाबद्दल ची संपूर्ण माहिती सांगितली तसेच शिक्षक कसा असावा याबद्दल वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. शुभम पाटील यांनी कामकाज पाहिले प्रा. आर. व्ही. पाटील सर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर व शिक्षणासाठीचे त्यांचे योगदान व भावी शिक्षकांना त्यांच्या बद्दलची प्रेरणा या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षिका दिव्या बोडे व जितेंद्र पोळ यांनी केले तर आभार अनिता धनगर या विद्यार्थी शिक्षकाने मानले या कार्यक्रमास जसवंती वसावे, पुष्पराज बाविस्कर, आरती चौधरी, अंकिता पाटील, दीपक पाटील, महेश पाटील, प्रशांत पाटील, महेंद्र पवार, प्रशांत मोरे, अमोल सुरळकर, आदी उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.