जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२२ । आज ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये लोकमान्य बाळगंगाधर टिळक याची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. असे म्हणतात की लोकमान्य टिळक ज्या दिवशी गेले त्या दिवशी. मुसळळधार पाऊस पडला. लोक म्हणतात की आकाश सुद्धा त्या स्वतंत्रवीर च्या जाण्याने खुप खुप रडला.
आज शाळेमध्ये लोकमान्य टिळक याच्या जुन्या आठवणी शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या व त्याचा जीवन प्रवास भारत स्वतंत्र प्रवास, पत्रकारिता, शिक्षक,शाळा, मराठी, शिवजयंती, गणेश उत्सव, हे असे सामाजिक उत्सव. ते तुरुंगवास आणि भागवतगीता परियंत मुलांना लोकमान्य बाळगंगाधर टिळक नेमके कोण आपल्या साठी काय केले हे सांगण्यात आले. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थांनी लोकमान्य टिळक याच्यावर भाषण केले. त्यांनी लढलेला स्वतंत्र लढा आपल्या निरागस शब्दात सांगितला.
लोकमान्य टिळक याच्या प्रतिमेला माल्यर्पण शाळेचे मुख्यध्यापक अजबसिंग राजपूत याच्या हातून करण्यात आले व कार्यकर्माचे सूत्रसंचालन बिलाल शेख यांनी केले. तसेच यावेळी मोलाचे योगदान म्हणजे कार्यक्रमाची तयारी. शिक्षिका वर्ग मनीषा पाटील, मयुरी पाटील, प्रेरणा महाजन, दर्शना शार्दूल, दर्शना खैरनार, जयश्री तहसीलदार, भारती तहसीलदार, कल्याणी पाटील,जयश्री पाटील, व शिपाई -वैष्णवी ठाकरे, अनिता पाटील यांनी केले..