⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 24, 2024
Home | बातम्या | ‘सालदार’ मिळत नसल्याने आता शेतकऱ्यांवर आले नवे संकट !

‘सालदार’ मिळत नसल्याने आता शेतकऱ्यांवर आले नवे संकट !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२३ ।  गुढीपाडवा सण जवळ आला की, शेतकऱ्यांचा शेतीकामासाठी सालदार शोधण्याची लगबग सुरू होते. गुढीपाडवाच्या दुसऱ्या दिवसापासून सालगडी हा कामावर रुजू होतो, मात्र यंदा सालगडी मिळणे अवघड झाले आहे व मिळाला तर सालगडी ठेवण्याची शेतकऱ्यांची तयारीच होत नसल्याचे दिसून येत आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून समाधानकारक पाऊस अवकाळी पावसाने पावसावर अवलंबून असलेला शेती व्यवसाय संकटात सापडलेला आहे.

गुढीपाडवा सण जवळ आला की, शेतकरी शेतीकामासाठी सालगडी म्हणून नोकरीस कोणाला लावावे, याचा विचार करू लागतो व त्यानुसार सालगडी शोधत असतो. मागील वर्षी सालगड्याला वार्षिक रक्कम ५० ते ६० हजारांपर्यंत सहज दिली गेली होती. यावर्षी अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आता गुढीपाडवा सण झाला, तरीही शेतकरी सालदार ठेवण्याची हिंमत दाखवत नसल्याचे चित्र दिसत आहे. यंदा सालगाड्याची वार्षिक रक्कम ऐकून शेतकरी थक्क होत आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह