⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | गुन्हे | सततच्या नापिकीला कंटाळून सालबर्डीच्या शेतकर्‍याची आत्महत्या

सततच्या नापिकीला कंटाळून सालबर्डीच्या शेतकर्‍याची आत्महत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२२ । तालुक्यातील सालबर्डी येथील एका तरुण शेतकर्‍याने सततच्या नापिकीमुळे होत असलेल्या आर्थिक नुकसानीला कंटाळून विष प्राशन करीत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार, 28 ऑक्टोंबर 2022 रोजी घडली. ललित संजय झोपे (31, सालबर्डी) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे.

उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत
ललित झोपे या शेतकर्‍यावर सततच्या नापिकीसह शेती पिकांवर उद्भवणारे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे आर्थिक् संकट कोसळले होते. आर्थिक नुकसानीच्या झळीला कंटाळून त्यांनी शेतात विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना गुरुवार, 27 ऑक्टोंबर रोजी सकाळी उघडकीस आली होती. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना पुढील उपचारार्थ जळगाव सिव्हील रुग्णालयात हलविण्यात आले मात्र शुक्रवारी मध्यरात्री 3.25 वाजता त्यांची प्राणज्येात मालवली. मयत शेतकर्‍याच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले असा परीवार आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह