जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२५ । कर्नाटक सरकारने आमदारांच्या पगारात शंभर टक्के वाढ केल्यानंतर काही दिवसांनी केंद्राने खासदारांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने खासदारांच्या पगारात 24 टक्क्यांची वाढ केलीय. तसेच माजी खाजदारांच्या पेन्शनमध्येही वाढ केलीय. ही पगारवाढ 1 एप्रिल 2023 पासून लागू झालीय.

एकीकडे देशात जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले असून यामुळे जनता महागाईच्या बोझ्या खाली दबत आहे. यातच केंद्राने खासदारांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला.
आता खासदारांना किती पगार मिळेल?
या पगारवाढीनंतर आता खासदारांना दरमहा 1, 24,000 रुपये मिळेल, आधी हा पगार 1 लाख रुपये होता. पगारवाढीसह खासदारांचा दैनंदिन भत्ताही वाढवण्यात आलाय. यात 500 रुपये वाढवण्यात आली आहेत. यानुसार, 2,500 रुपये वाढ करण्यात आलीय.
माजी खासदारांची पेन्शन 25 हजार रुपयांवरून 31 हजार रुपये प्रति महिना करण्यात आलीय. अतिरिक्त पेन्शनमध्ये 2500 रुपयांची वाढ करण्यात आलीय. याआधी खासदारांना 2000 रुपये मिळत होते. वेतन आणि भत्त्यातील वाढ 2018 नंतर करण्यात आलीय. यात खासदारांच्या वेतनात आणि भत्त्याचा आढावा पाच वर्षानंतर घेतला जातो.
ज्या मतदारांच्या जीवावर आमदार खासदार निवडून येतात त्यांनी फक्त वेळ आली की मतदान करायचे .आणि निवडून आल्यानंतर आमदार खासदार जनतेकडे 5 वर्ष बघत सुद्धा नाही त्यांना एवढा मानधन आणि पेन्शन आवश्यक आहे का जनतेच्या पैशाची ही लूट आहे भारत देश हा गरीब देश आहे कोणताही पुढारी गरीब नाही तेव्हा मानधन v pension
वाढविण्याची गरज आहे का प्रत्येक राज्यावर करोडो रुपये खर्च आहे याचा विचार करायला पाहिजे