⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | सायगाव बंधाऱ्यात बैलगाडी पलटी होऊन दोघा तरुणांचा मृत्यू

सायगाव बंधाऱ्यात बैलगाडी पलटी होऊन दोघा तरुणांचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ जुलै २०२१ । चाळीसगाव | शेतातून काम करून घराकडे येत असताना बंधाऱ्यावरून बैलांना पाणी पाजण्यासाठी तालुक्यातील सतारा नाल्यात जात असताना, दि 8 जुलै रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बैलगाडी पलटी होवुन दोघे तरुण पाण्यात पडून जबर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी चाळीसगाव येथे आणले असता रस्त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोघे जण आत्ये व मामेभाऊ असून, एक जण एकुलता एक आहे.

प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील सायगाव येथील राकेश चिला माळी, २१ हा पिलखोड येथे आय टी आय शिकत होता. आई वडिलांना एकुलता एक असून वडील अंध आहेत. तर दुसरा तरुण सुकदेव जगन जाधव, १७ दोघे आतेभाऊ-मामेभाऊ दि 8 जुलै रोजी शेतात गेले होते. शेतातून घराकडे सायगाव येथे बैलगाडी वर येत असताना सायगाव शिवारातील रस्त्यावर असलेल्या सतारी नाला येथे बैलांना पाणी पाजण्यासाठी  बंधाऱ्यावरून जात असताना बैलगाडी पलटी होऊन पाण्यात दोघांच्या अंगावर बैलगाडी पडल्याने  गाडीखाली दाबून जखमी झाले. बाजूलाच मेंढपाळ लोक होते त्यांनी पाहिले असता ते धावत आले त्यांनी आरडाओरडा करून लोक जमा झाले. त्यांना जखमी अवस्थेत चाळीसगाव येथे रुग्णालयात आणतांना रस्त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.