⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

साहिल. एम. पटेल यांचा अजितदादा गटातप्रवेश

जळगाव लाईव्ह न्यूज| ९ ऑगस्ट २०२३। राष्ट्रवादी जळगाव युवा वरिष्ठ उपाध्यक्ष पदी असलेले साहिल पटेल यांनी आपल्या सुमारे ६० ते ७० युवकांसह नामदार केबिनेट मंत्री अनिल दादा पाटील यांच्या उपस्थितीत अजितदादा गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत महानगर युवाचे रफिक पटेल अकील पटेल यांच्या सह सुमारे ६० ते ७० कार्यकर्ते यांनी प्रवेश केलेला आहे नामदार केबिनेट मंत्री अनिल दादा पाटील साहेब यांनी साहिल पटेल व त्यांच्या समर्थकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

पुढील राजकीय कार करकिदिस शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत रवींद्र नाना पाटील, अभिषेक पाटील, वाय एस महाजन सर, अशोक पाटील व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते या साहिल पटेल यांच्या प्रवेशाने त्यांचे अभिनंदन केले जात आहे. यावेळी साहिल पटेल यांनी मुस्लिम समाजाचे असंख्य कार्यकर्ते जोडून पक्षाला मजबूत करण्याचे आश्वासन नामदार मंत्री पाटील यांना दिले.