जामनेरमध्ये भाजपाचा पहिला विजय ; नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना महाजनांची बिनविरोध निवड

नोव्हेंबर 20, 2025 4:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषद आणि नगर पंचायतीसाठी येत्या २ डिसेंबरला निवडणूक पार पडणार असून ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आलीय.

sadhana mahajan

जामनेर नगरपरिषदमध्ये भाजपचा विजयाचा गुलाल उधळला गेला आहे. यात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या सौभाग्यवती साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Advertisements

जामनेर नगर परिषदेसाठी यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जाहीर झाले होते. दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना मंत्री गिरीश महाजन यांच्या सौभाग्यवती साधना महाजन यांना भाजपतर्फे उमेदवारी होती. साधना महाजन यांना यापूर्वीही जामनेरच्या नगराध्यक्षा म्हणून काम करण्याचा अनुभव असल्याने त्यांच्या नावाला भाजप पक्ष श्रेष्ठींकडूनही पंसती दिला जात होती.

Advertisements

या निवडणुकीसाठी भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी पूर्ण ताकद लावली होती. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून महाजन कुटुंबाचा या निवडणुकीत मोठा विजय झाला आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली होती.रंतु आता या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी आज (20 नोव्हेंबर) माघार घेतली आहे. त्यामुळे आता साधना महाजन यांचा बिनविरोध निवडून आल्या आहेत.

साधना महाजन यांच्या विजयासह जामनेर नगरपालिका जळगाव जिल्ह्यातील बिनविरोध नगराध्यक्ष निवडणारी पहिली नगरपालिका ठरली आहे. उज्वला दीपक तायडे, किलुबाई शेवाळे, सपना रवींद्र झाल्टे, संध्या जितेंद्र पाटील, आणि नानाभाऊ बाविस्कर अशी आतापर्यंत बिनविरोध झालेल्या उमेदवारांची नावे आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने आघाडी घेतली असून 27 पैकी 5 जागा बिनविरोध झाल्या आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now