⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

ना परीक्षा ना मुलाखत! रेल्वेत 3093 जागांसाठी भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

RRC NR Recruitment 2023 तुम्हीही जर रेल्वेत नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), उत्तर रेल्वेने शिकाऊ पदांच्या भरतीसाठी जाहीर केली आहे. तब्बल 3093 जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहे. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. RRC NR Bharti 2023

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 जानेवारी 2024 आहे. त्यानंतर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज नाही करू शकत. या भरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. www.rrcnr.org या apprentice.rrcner.net वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. भरती प्रक्रियेची सर्व माहिती तुम्हाला इथे मिळेल.

शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी किमान 50 टक्के गुणांसह मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, सरकारने मान्यताप्राप्त NCVT/SCVT द्वारे जारी केलेल्या संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

परीक्षा फी : जनरल/ओबीसी उमेदवारांना 100 रुपये, तर SC, ST, PWD आणि महिला प्रवर्गातील उमेदवारांना सवलत देण्यात आली असून त्यांना कोणतेही शुल्क भरावं लागणार नाही.

निवड कशी होईल?
या रेल्वे भरतीसाठी उमेदवारांची निवड अर्जांच्या छाननीवर आधारित असेल. परीक्षा आणि मुलाखतीशिवाय निवड केली जाईल.

अर्ज दाखल कसा करायचा?
उत्तर रेल्वेने अद्याप भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. अधिकृत वेबसाइटवर भरतीसाठी लिंक तीन दिवसांनंतर म्हणजेच 11 डिसेंबर 2023 पासून सक्रिय होईल.

अधिसूचना पहा : PDF