जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२१ । रॉयल रायडर सायकलिस्टग्रुप,नाशिक यांची नाशिक ते शेगाव सायकल स्वारी अमळनेर मार्गे शेगाव ला जात असताना अमळनेर येथे मंगळगग्रह मंदिरात थांबून मंगळग्रह येथील देवतेचे दर्शन घेतले. सर्व सायकल स्वारांना नाश्त्याची सोय मंदिर संस्थान तर्फे इडली,सांबर, बर्फी व चहा,बिस्कीट, असा नाष्टा करून सर्व सायलिस्ट यांना पुढील प्रवासास शुभेच्छा देण्यात आल्या.
मंगळग्रह संस्थेच्या वतीने अध्यक्ष दिगंबर महाले यांच्या वतीने शरद कुलकर्णी , भूषण पाटील यांनी सर्व सायकलिस्ट यांचे स्वागत करून मंदिराविषयी माहिती दिली .यावेळी जवळजवळ 100 रॉयल रायडर महिला व पुरुष सायकलिस्ट उपस्थित होते. सलग पाच वर्षापासून नासिक ते शेगांव सायकल प्रवास करीत आहेत. याप्रसंगी नासिक रायडर ग्रुपचे डॉ आबा पाटील,अरुण काळे,राजाभाऊ पोटमे,संतोष पवार,नितीन पाटील एल आय सी डी ओ अमळनेर,संजय बागुल,अनिल महाले,महेंद्र पाटील हे उपस्थित होते.
विशेष म्हणजे या ग्रुप मधील अंध सायकलिस्ट सागर बोडके व त्यांचे सहकारी विशाल शेळके हे गेल्या तीन वर्षांपासून सोबत डबलशिट सायकल चालूवून आतापर्यंत त्यांनी पंढरपूर, शिवनेरी,शेगाव,नाशिक जवळपास चे अनेक ठिकाणी सायकलवर प्रवास केला आहे. यामुळे त्यांचे विशेष कौतुक होत असते.
हे देखील वाचा:
- जळगाव गारठले! आगामी दोन दिवस थंडीचा जोर कायम राहणार
- मुक्ताईनगरमध्ये गुरांची निर्दयतेने वाहतूक; पोलिसांची मोठी कारवाई
- जळगावच्या महिला वकिलाची तब्बल 75 लाख रुपयात फसवणूक
- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 33 वा पदवीदान समारंभ संपन्न
- Muktainagar : लाच घेताना तलाठ्यासह दोन खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात