---Advertisement---
चाळीसगाव

धक्कादायक : शासकीय निवासी शाळेतील चिमुकल्यांना सडलेल्या, किडलेल्या भाजीपाल्याचे जेवण

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | ९ ऑक्टोंबर २०२३ | चाळीसगाव शहरातील डेराबर्डी जवळ असणाऱ्या नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेतल्या विद्यार्थ्यांना सडलेल्या, किडलेल्या भाजीपाल्याचे जेवण बनवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी उघडकीस आणला आहे. कांदा सडलेला, कोबी किडलेली, बिट सडलेले, गिलके पिकलेले, तांदूळ खराब असल्याने यापासून बनवलेले जेवण विद्यार्थ्यांना देणे म्हणजे त्यांच्या जीवाशी एकप्रकारे खेळ असल्याचा संताप आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

cls jpg webp

याबाबत एक व्हिडीओ तयार करुन आमदार चव्हाण यांनी त्यांच्या फेसबूक पेजवर शेअर केला आहे. त्यात म्हटलं आहे की, शाळेतील शौचालय व स्नानगृहे यांचे दरवाजे तुटलेले आढळले. तसेच बेड ज्या साईज चे होते मात्र त्यावर असणाऱ्या गाद्या छोट्या होत्या. सर्वात गंभीर बाब म्हणजे शाळेच्या शैक्षणिक दर्जा अतिशय खालावलेला दिसून आला. दहावी मधील विद्यार्थ्याला इंग्रजी वाचता येत नव्हते तर सहावीतल्या विद्यार्थ्यांला आपल्या आईचे नाव लिहिता आले नाही.

---Advertisement---

शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून अतिशय चांगल्या सुविधा असणारी शाळा उभी केली आहे, येथे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या फक्त जेवणावर महिन्याला १८०० रुपये खर्च शासन देते. यासोबतच शिक्षकांना लाखोंचा पगार, सोयी सुविधा शासन देते, पालक देखील मोठ्या अपेक्षेने मुलांना याठिकाणी शिक्षणासाठी पाठवतात. मात्र इकडे ठेकेदार व प्रशासनाची भ्रष्ट युती विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ करत आहे. तसेच शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे शिक्षणाचा दर्जा खालावल्याने भावी पिढीचे देखील नुकसान होत आहे.

भाजपा सेना महायुती सरकार अतिशय संवेदनशीलपणे राज्याच्या हितासाठी काम करत आहे. दलित, आदिवासी, वंचित घटकांना न्याय देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत मात्र त्या शाळेच्या स्वयंपाकघरात किडलेल्या भाजीपाल्याप्रमाणे प्रशासकीय यंत्रणा देखील किडली असल्याने शासनाच्या गरीब कल्याणाच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे असं मला वाटतं.

मी सदर गंभीर बाबींची तक्रार मा.मुख्यमंत्री महोदय, समाजकल्याण विभागाचे सचिव यांच्याकडे करणार असून यात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच यापुढे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे जेवण, चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण मिळालेच पाहिजे यासाठी माझा पाठपुरावा सुरू राहील, असा इशाराही आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---