जळगाव शहर
रोटरी क्लब जळगाव स्टारतर्फे पोलिसांना सुरक्षा किट वाटप
जळगाव शहरातील रोटरी क्लब जळगाव स्टारतर्फे रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना सॅनिटायझर, मास्क, टोपी आणि व्हिटॅमिन सीच्या १५ दिवसांच्या गोळ्या असलेले किट वाटप करण्यात आले आहे.
रोटरीचे अध्यक्ष धनराज कासट, सागर मुंदडा, जिनल जैन, हितेश सुराणा यांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले.