जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२२ । नेत्यांचे अयोध्या दौरे हा विषय सध्या राज्यातल्या चर्चेच्या प्रमुख विषयांपैकी एक आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा, धामधूम सध्या सुरू असून ते ५ जून रोजी ते अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.तर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे देखील आगामी काही दिवसात अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र आता चर्चा होतेय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या दौऱ्याची. मात्र या दोघांच्याही आधी आमदार रोहित पवार यांनी अयोध्या गाठली आहे. ते सध्या सहकुटुंब तीर्थयात्रेला गेले आहेत.
रोहित पवार सध्या सहकुटुंब तीर्थयात्रेला गेले आहेत. या यात्रेदरम्यान काल त्यांनी राजस्थानमधल्या राधा गोविंद मंदिराला भेट दिली. या मंदिराचं, भारतीय इतिहासाचं कौतुक पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून केलं आहे. त्यानंतर पुष्करचं ब्रह्म मंदिर, सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा अजमेर इथला दर्गा इथंही रोहित पवारांनी भेट दिली. या ठिकाणी आपण देशाच्या आणि राज्याच्या कल्याणासाठी प्रार्थना केल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान मागील चार दिवसांपासून राजस्थान दौऱ्यावर असलेले रोहित पवार उत्तर प्रदेश दौऱ्यावर निघाले आहेत. आज ते आपल्या कुटुंबियांसह अयोध्येत दाखल होतील आणि प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतील. विशेष म्हणजे एकीकडे राज्यातील मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी अयोध्या दौऱ्याच्या घोषणा केल्या आहेत. तर दुसरीकडे कोणतीही घोषणा किंवा गाजावाजा न करता रोहित पवार अयोध्येला जात आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.