---Advertisement---
राजकारण जळगाव जिल्हा

रोहिणी खडसेंनी भेट घेत गुलाबराव पाटलांना दिल्या शुभेच्छा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२२ । जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला भेट घेत जिल्हा माजी अध्यक्षा ऍड.रोहिणी खडसे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. एरव्ही राजकारणात खडसे विरुद्ध गुलाबराव पाटील असे शाब्दिक युद्ध पाहावयास मिळते परंतु आनंदाच्या क्षणी सर्व राजकारणी शक्यतो मतभेद विसरून एकत्र होतात हे या निमित्ताने दिसून आले.

gulab p birthday jpg webp

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात बऱ्याच वेळा शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले आहे. नुकतेच मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या टिकेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं देताना गुलाबराव पाटलांनी खडसेंवर टीका केली होती. काही दिवसांपूर्वी देखील खा.रक्षा खडसे विरुद्ध गुलाबराव पाटील असे शाब्दिक युद्ध आपल्या पाहायला मिळाले होते.

---Advertisement---

आज दि.५ जून रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस असून वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा ऍड.रोहिणी खडसे यांनी त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. रोहिणी खडसे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून ही भेट असल्याचे समजते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---