जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२२ । तालुक्यातील येवती, रेवती, जामठी शिवारात झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.
गेल्या आठवड्यापासून सतत सुरू असलेला संततधार पाऊस व त्यातच शुक्रवार (दि 16) रोजी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे बोदवड तालुक्यातील येवती, रेवती, जामठी शिवारात पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन मका, कपाशी,सोयाबिन, तुरीचे पिक कोलमडून पडले असुन जमिनदोस्त झाले आहे कपाशीच्या कैऱ्या काळवंडून सडायला लागल्या आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे परंतु अद्याप प्रशासनाने त्याचे पंचनामे केले नाही आहेत.
रोहिणी खडसे यांनी पदाधिकाऱ्यांसह येवती, रेवती, जामठी शिवारात शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली व बोदवड च्या प्रभारी तहसीलदार श्वेता संचेती यांच्या सोबत दूरध्वनीवरून संपर्क करून सोमवार पासून नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून शासन दरबारी मदतीसाठी पाठपुरावा करावा याबाबत चर्चा केली
यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आबा पाटील,रामदास पाटील,कैलास चौधरी, भरत अप्पा पाटील,गणेश पाटील,किशोर गायकवाड,प्रदिप बडगुजर, दिपक झाबड,विजय चौधरी, रामराव पाटील, प्रमोद धामोडे,सतिष पाटील, किरण वंजारी, हकिम बागवान,लतीफ शेख,मुजमिल शहा,अक्षय चौधरी, राजेश जैस्वाल,मयुर खेवलकर,आनंदा माळी, प्रफुल पाटील उपस्थित होते.
यावेळी रेवती येथील सुपडू राऊत, बाबुराव सत्रे, संदिप राऊत, अंकुश भगत, संजय कापसे, सुभाष राऊत, रामदास भुसारी, वैभव जंजाळ, येवती येथिल शांताराम सावरीपगार,अनिल अहिर, समाधान श्रावणे, हनिफ खा पटेल, नवल माळी, रामदास श्रावणे, विनोद माळी, अंजना बाई श्रावणे, सोपान चौधरी, जामठी येथील ईश्वर महाजन, पवन महाजन, सचिन महाजन, देविदास पाटील, विशाल महाजन,भागवत पाटील, शे मुनाफ, जितेंद्र पारधी, राजु पाटील, भागवत पाटील आणि शेतकरी बांधव उपस्थित होते
जामठी, येवती, रेवती शिवारात वादळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्या बाबत तहसीलदार यांच्या सोबत चर्चा केली एकनाथराव खडसे यांनी सुद्धा जिल्हाधिकारी यांच्या सोबत पंचनामे करण्या बाबत चर्चा केली असून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना मदत मिळावी यासाठी शासनाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करणार आहोत
-रोहिणी खडसे खेवलकर