---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

रोहिणी खडसेंनी सोशल मीडियावरुन वडिलांचा फोटो हटवला

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२४ । राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करत घरवापसी करणार आहे. येत्या काही दिवसात त्यांचा भाजपात प्रवेश होणार आहे. खडसेंनी भाजपमध्ये प्रवेश करणार असं स्पष्ट केल्यानंतर त्यांच्या कन्या रोहिनी खडसे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले. यातच रोहिणी खडसेंनी आपल्या सोशल मीडिया पेजवरुन एकनाथ खडसे यांचा फोटो हटवला आहे.

rohini khadse social media jpg webp

एकनाथ खडसेंनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहिणी खडसेही त्यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा होती. मात्र रोहिणी खडसेंनी आपण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं होते. एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे विद्यमान खासदार आणि आता रावेर लोकसभेच्या भाजप उमेदवार आहेत. आता सासरा आणि सून एक पक्षात तर वडील आणि मुलगी वेगवेगळ्या पक्षात असणार आहे. यामुळे रोहिणी खडसे यांनी त्यांच्या सोशल
मीडिया पेजवरुन एकनाथ खडसे यांचा फोटो हटवला आहे.

---Advertisement---

एकनाथ खडसे यांच्या भाजपमध्ये जाण्याचा निर्णयावर माहिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष असणाऱ्या रोहिणी खडसे म्हणाल्या, त्यांचा निर्णय का झालाय हे त्यांनी स्पष्ट केले आहे. मी राष्ट्रवादी पक्षासाठी येथे थांबली आहे. शरद पवार यांनी आम्हाला साडेतीन वर्षे मदत केली आहे. नाथाभाऊ भाजप सोबत जात आहेत. यामुळे आपण एकटं पडणार असे वाटत. पण कार्यकर्ते आणि लोक आमच्यासोबत आहेत. मी राष्ट्रवादी पक्षात रुरळे आहे. पक्षातील प्रत्येक जण माझ्यासोबत आहेत. आता मी माझ्या पक्षाची विचारधारा घेऊन पुढे जाणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---