गणेश विसर्जन : जळगाव शहरातील वाहतूक मार्गात बदल
जळगाव लाईव्ह न्यूज | १८ सप्टेंबर २०२१ | रविवार दि.१९ रोजी गणेश विसर्जन केले जाणार असून याच पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील मेहरूण तलावाजवळ गर्दी होऊ नये म्हणून वाहतूक वळवण्यात आली आहे. इच्छादेवी मंदिर ते मंगल शहा बाबा दर्गा दरम्यान वाहनांची वर्दळ लक्षात घेता रस्त्याच्या रहदारीची सुव्यवस्था राखण्यासाठी इच्छादेवी मंदिर ते शिरसोली रस्त्यावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
जळगाव ते पाचोरा येणाऱ्या जाणाऱ्या एसटी बसेस व इतर अवजड वाहनांकरिता
इच्छा देवी चौक, डी मार्ट, मोहाडी रोड, गायत्री नगर, गणेश घाट, हॉटेल ग्रेपीज, मंगल शहा बाबा दर्गा या रस्त्यावरील वाहतूक बसेस व इतर प्रकारच्या सर्व अवजड वाहनांसाठी सुरू असणार आहे.
जळगाव ते पाचोरा येणाऱ्या लहान वाहनांकरिता
इच्छा देवी चौक, डी मार्ट, मोहाडी रोड, गायत्री नगर, गणेश घाट पासून ते शिरसोली मार्गापर्यंत जाणारा वाहतुकीचा रस्ता सर्व कार हलके वाहन मोटर सायकल व इतर वाहनांसाठी बंद असणार आहे.
हलक्या वाहनांकरिता पर्यायी रस्ता
जळगावकडून पाचोराकडे जायचे असेल तर आकाशवाणी चौक ते काव्यरत्नावली चौक डी मार्ट मोहाडी रोड पेट्रोल पंप, मंगल शहा बाबा दर्गा मार्ग इथून पाचोरा कडे जाता येणार आहे.
त्याच बरोबर जर जळगाव कडे यायचे असेल तर याच मार्गाने नागरिकांना येता येणार आहे.
असोदा भादली कडून जळगावकडे येणाऱ्या व जाणाऱ्या एसटी बसेस व इतर सर्व वाहने रविवारी सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत मोहन टॉकीज, गजानन मालुसरे नगर, कालिका माता मंदिर, अजिंठा चौक, आकाशवाणी चौक, नवीन बस स्टँड, या मार्गावरून वळवली जाईल