Chopda : पेट्रोल पंपावरील दरोडाचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला, मुद्देमालासह दरोडेखोर जाळ्यात

मे 30, 2025 5:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असताना त्यातच हातेड (ता. चोपडा) नजीक पेट्रोल पंपाजवळ दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दरोडेखोरांच्या चोपडा ग्रामीण पोलिसांनी मुद्देमालासह मुसक्या आवळल्या. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

daroda chopda

काय आहे प्रकार?
चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातेड गावातील युग पेट्रोल पंपाजवळ काही दरोडेखोर दोन दुचाकीवर आले असल्याची गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कविता कमलाकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान पथकाने बुधवारी २८ मे रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास दोन दुचाकीवर आलेले संशयित आरोपी सोनू चक्कर चव्हाण (वय-२५), यशवंत निराधार पवार (वय-४२), धर्मा चिमण भोसले (वय-४०) आणि भरत निराधार पवार (वय-३८ सर्व रा.जामदे ता. साक्री जि.धुळे) यांना अटक केली. त्यांच्याकडून चार मोबाईल, दोन दुचाकी तसेच लाल मिरचीची पावडर आणि पिवळ्या पट्ट्या असा एकूण ३ लाख २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

त्यांच्याकडून अजून काही इतर चोरीचे किंवा दरोड्याचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल गजानन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरोधात विरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवारे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment