⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | दमदाटी करून खिशातून पैसे लुटले; गुन्हा दाखल

दमदाटी करून खिशातून पैसे लुटले; गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । फेब्रुवारी २०२२ । दारूची बाटली न दिल्यामुळे एकाने बार मालकाला शिवीगाळ, मारहाण करून त्याच्या खिशातून एक हजार रुपये बळजबरीने लुटल्याची घटना १ रोजी रात्री १० वाजता घडली. या प्रकरणी एका विरोधात जबरी लुटीचा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

महेंद्र पमनदास ललवाणी (रा.जुना सरकारी दवाखाना) हे १ रोजी रात्री १० वाजता धुळे रोडवरील त्यांच्या योगेश बारच्या बाहेर उभे होते. त्यावेळी आर.के.नगर मधील बबलू महाराज याने त्यांच्याकडे दारूची बाटली मागितली. बार मालकाने नकार देताच बबलू महाराज याने शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. तसेच दमदाटी करून त्यांच्या शर्टाच्या वरच्या खिशातील एक हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. महेंद्र ललवाणी यांच्या फिर्यादीवरून बबलू महाराज यांच्या विरुद्ध अमळनेर पोलिसांत जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर करत आहेत.

हे देखील वाचा :


author avatar
टीम जळगाव लाईव्ह