---Advertisement---
यावल

यावल ते सातोद मार्गावरील बुरूज चौक ते शासकीय गोदामापर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणास सुरूवात

yawal
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ जून २०२१ । यावल येथील यावल ते सातोद मार्गावरील बुरूज चौक ते शासकीय धान्य गोदामा पर्यंतच्या रस्त्याच्या दोन वर्षापासुनच्या मोठया प्रतिक्षेनंतर सुरूवात करण्यात आली असुन, या मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण तात्काळ व्हावे यासाठी विविध पक्षांच्या वतीने मागणी करण्यात आली होती.

yawal

अखेर प्रशासनाने याची दखल घेत कामाला अखेर सुरुवात झाल्याने शेतकरी ,पादचारी व वाहन धारकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भातील वृत्त असे की, यावल ते सातोद या मार्गावरील बुरूज चौक ते शासकीय धान्य गोदामा पर्यंतच्या ५०० मिटर रस्त्याचे डांबरीकराणाचे बहुप्रतिक्षेत असलेल्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाली आहे.

---Advertisement---

दरम्यान अत्यंत वेगाने होत असलेल्या या डांबरीकरणाच्या कामात संबधीत ठेकेदाराकडुन डांबराचा अत्यल्प  प्रमाणावर वापर करण्यात येत आहे असुन, येणाऱ्या पावसाळयातच हा रस्ता जैसे थे अवस्थेत येण्याची चिन्ह दिसुन येत आहे. यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सदरच्या डांबरीकरणाच्या कामावर नियंत्रण नसल्याचे बोलले जात असुन, संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदरचे काम हे अटीशर्तीच्या अधिन राहुन करण्यात येत आहे की नाही याची खातरजमा करणे हे त्यांचे कर्तव्य असुन तात्काळ या डांबरीकरणाच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---