दिलासादायक ! भुसावळमार्गे ‘या’ दोन शहरादरम्यान धावणाऱ्या विशेष ट्रेनचा कालावधी वाढवला

जुलै 12, 2025 2:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२५ । रेल्वेत गाड्यांमध्ये होणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्ष्यात घेऊन रेल्वे प्रशासनाने जळगाव, भुसावळामार्गे काही विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ केली. अशातच आता रिवा व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक विशेष गाडीच्या सेवेचा कालावधी वाढवला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

train

गाडी क्रमांक ०२१८७ रिवा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष गाडीची सेवा आता ३ जुलैपर्यंत होती. ती आता २५ सप्टेबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०२१८८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-रिवा साप्ताहिक या विशेष गाडीची सेवा आता ४ जुलैपर्यंत होती. ती आता २६ सप्टेबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. रेल्वे गाडीच्या वेळापत्रकात व थांब्यामध्ये काहीही बदल झालेला नाही.

Advertisements

या स्थानकांवर आहे थांबा :

सतना, मैहर, कटनी, जबलपूर, नरसिंगपूर, गदरवाडा, पिपरीया इटारसी, हरदा, खांडवा, भुसावळ, मनमाड, नाशिक, कल्याण आणि दादर या स्थानकांचा समावेश आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now