सध्या इलेक्ट्रिक बाईकला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. बाजारात अनेक प्रकारच्या इलेक्ट्रिक बाईक उपलब्ध आहेत ज्या चांगल्याप्रकारे रेंज देतात. अशातच तुम्हीही तुम्ही जबरदस्त इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
दुचाकी उत्पादक कंपनी Revolt ने आपली इलेक्ट्रिक बाईक RV1 भारतात लॉन्च केली आहे. ही बाईक RV1 आणि RV1+ या दोन प्रकारात सादर करण्यात आली आहे.बाईकला दोन बॅटरी पर्याय देण्यात आले आहेत. ज्यामध्ये 2.2 kWh बॅटरी आणि 3.24 kWh बॅटरी देण्यात आली आहे. या दोन्ही बॅटरी अनुक्रमे 100 किलोमीटर आणि 160 किलोमीटरची रेंज देतात, असं कंपनीचं म्हणणं आहे.
किंमत आणि फीचर्स
किमतीबद्दल बोलायचे झाले तर Revolt RV1 ची एक्स-शोरूम किंमत 84,990 रुपये आहे. तर RV1+ ची एक्स-शोरूम किंमत 99,990 रुपये आहे. ही बाईक तुम्हाला चार रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. याआधीही कंपनीने RV400 सारखी बाईक बाजारात आणली आहे.
160km ची जबरदस्त रेंज, रिव्हर्स मोड, स्पोर्टी लूक; Revolt ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक लॉन्च; किंमत किती?
Electric Bike: मुंबईहून पुणे एका चार्जमध्ये गाठणार, लॉन्च झाली ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक बाईक; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
RV1 हे कंपनीच्या RV400 चे अपग्रेड मॉडेल आहे. यात फास्ट चार्जिंगची सुविधा आहे. ही बाईक 90 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल, तर रिव्हर्स मोड फीचरमुळे बाईक पार्क करणे सोपे होईल. या बाईकमध्ये डिजिटल डिस्प्ले आहे, जो अनेक फीचर्सने सुसज्ज आहे. याशिवाय ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, बिल्ट-इन लेग गार्ड आणि सेंटर स्टँड सारखे फीचर्स यात उपलब्ध आहेत.
बाईकमध्ये 6 इंचाचा डिजिटल एलसीडी डिस्प्ले आहे. यात नवीन एलईडी हेडलाइट्स आणि एलईडी टेल लाइट्स आहेत. बाईकमध्ये अनेक स्पीड मोड देखील दिलेले आहेत, त्यापैकी एक रिव्हर्स मोड आहे. त्यामुळे पार्किंग करणे सोपे होणार आहे. बाईकला रुंद टायर देण्यात आले आहेत, ज्यामुळे बाईक अधिक स्थिर राहते. चांगल्या ब्रेकिंगसाठी, बाईकला ड्युअल डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.