जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२२ । नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे, शहादा तालुक्यात दुपारनंतर परतीच्या मुसळधार पावसाने हजेरी लावली.यामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याचा अंदाज आहे.
जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेसह नंदुरबार आणि नवापूर तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नंदुरबार जिल्ह्यात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असेही आवाहन केले आहे. याच बरोबर नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
दरम्यान परती पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. तर शहादा शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याच पाहायला मिळाले.