जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२४ । यंदा देशातील अनेक भागात मान्सून चांगला भरसला असून आता सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून परतीचा मान्सून सुरु होतो. अशातच भारतीय हवामान विभागाने यंदा सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मान्सून लांबण्याचा अंदाज वर्तविला आहे. ‘ला निना’च्या प्रभावामुळे तयार होणाऱ्या कमी दाबामुळे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चांगला पाऊस आहे. यामुळे खरीप हंगामातील गहू, हरभरा या पिकांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच खरीप लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे.
यंदा वेळेआधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. केरळमध्ये मे महिन्यात मान्सूनचे आगमन होते. त्यानंतर देशभरात जून महिन्यात मान्सून पोहचतो. चार महिने मुक्काम करणारा मान्सून सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून परतीचा प्रवास सुरू करतो. परंतु यंदा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मान्सूनचा परतीचा मुक्काम सुरु होणार आहे. यामुळे ऑक्टोबरमध्ये देशात मान्सून राहणार आहे.
कोकण विभागात ७ ते १२ सप्टेंबरच्या आठवड्यामध्येही पावसाची तीव्रता जास्त असणार आहे. उत्तर गुजरातवरील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत मुंबई, उत्तर मध्य महाराष्ट्रात पावासाची शक्यता आहे. महाराष्ट्रात सर्वत्र यंदा आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यामुळे राज्यातील धरणांमध्ये जलसाठाही वाढला आहे.
‘ला निना’च्या प्रभावामुळे भारतात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मुसळधार पाऊस आहे. मान्सूनचा मुक्काम वाढणार असल्यामुळे खरीप हंगामातील गहू, हरभरा या पिकांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच खरीप लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे. यंदा आतापर्यत 7 टक्के अधिक पाऊस झाला आहे. यंदा गणेशोत्सात पाऊस असणार आहे.